भाजप नेत्यांकडून मोदींची फसवणूक- आदित्य ठाकरे
भाजपमध्ये नेत्यांची गर्दी झाली असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फसवणूक करत असल्याची टीका युवासेनेचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजिव आदित्य ठाकरे यांनी केली. आदित्य ठाकरे जळगाव येथील सभेत संबोधित केले.
आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील भाजपच्या दोन-चार नेत्यांनी शिवसेनेसोबतची 25 वर्षे जुनी मैत्री तोडली. या नेत्यांना कोणी विचारत नाही. परंतु हे नेतेच मोदींची फसवणूक करत आहेत. जळगाव शहर मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार सुरेश जैन यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे बोलत होते.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी, दिवंगत प्रमोद महाजन, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी युतीची बांधणी केली होती. परंतु काही डोक्यांनी ही युती एका क्षणात तोडली. माझ्या वयापेक्षा युतीचे वय अधिक आहे. या डोक्यांना धडा शिकावणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.