शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: औरंगाबाद , शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2014 (10:22 IST)

सोनिया गांधीकडून शरद पवारांवर कडाडून प्रहार

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षकडाडून  टीका केली आहे. काल जे आमच्यासोबत होते ते उद्या कोणासोबत जातील हे सांगता येत नाही. त्यांच्यात सत्तेची  लालसा आहेत. जनतेशी त्यांना काही घेणे देणे नाही. त्यांना फक्त खुर्चीशी मतलब आहे. त्यामुळे अशा  नेत्यांपासून सावध राहा अशा शब्दात सो‍निया गांधी यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख न करता कडाडून टीका केली.
 
सोनिया गांधी औरंगाबाद येथील सभेत बोलत होत्या. सोनिया म्हणाल्या, शिवसेना-भाजप एकमेकांविरुद्ध लढत असले तरी उद्या कोणासोबत जातील हे सांगता येत नाही. देशासह महाराष्ट्राचा विकास कॉंग्रेसच्या कार्यकाळात झाला आहे. भाजप खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप सो‍नियांनी केला. यावेळ प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि मोहन प्रकाश उपस्थित होते.