शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2014 (12:29 IST)

‘द वीक’ सर्व्हे

भाजपला 154 जागा मिळण्याचा अंदाज

महाराष्ट्र विधानसभेसाठी या महिन्याच्या पंधरा ऑक्टोबर रोजी मतदान होण्याअगोदर  मीडियाने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये भाजप व मित्रपक्षाला 288 पैकी 154 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना म तदारांनी सर्वात जास्त पसंती दिली आहे.
 
माजी मुख्मंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना मतदारांनी दुसर्‍या क्रमांकाची पसंती दिली असून काँग्रेस पक्षाला 25 जागा मिळतील, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. टक्केवारीच्यादृष्टीने भाजप 36.50 टक्के, शिवसेना 17.10 टक्के तर काँग्रेसला 11.67 टक्के इतकी मते मिळण्याचा संभव असल्याचे या सर्वेक्षणामध्ये दाखवून देण्यात आले आहे.
एकूण जागा 288
भाजप 154
शिवसेना 47
मनसे 10
काँग्रेस 25
राष्ट्रवादी 17
अपक्ष 20
इतर 15
  288
‘द वीक’ साप्ताहिक व हंस रिसर्च या संस्थेच्या सर्वेक्षणामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त 17 जागा मिळतील व मतांच्या टक्केवारीचे प्रमाण 5.85 टक्के इतके राहील, असे नमूद करण्यात आले आहे. पवार यांचे स्थान भावी मुख्मंत्रिपदाच्या स्पर्धेत पाचवे दाखविण्यात आले आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज ठाकरे व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्थान सहाव्या व सातव्या क्रमांचे राहील, असे दाखविण्यात आले आहे. अपक्ष वीस उमेदवार निवडून येण्याची शक्यता  असून त्यांना मिळणार्‍या मतांची टक्केवारी 6.79 इतके राहील, असे या सर्वेक्षणामध्ये  सांगण्यात आले आहे.