शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 14 ऑक्टोबर 2014 (10:08 IST)

एक्झिट पोलचे निकाल पैशाच्या जोरावर केले खरेदी- राज ठाकरे

सर्वेक्षणांतून दाखवले जाणारे अंदाज खरे असतील असे वाटत नाही. एक तर हे सर्व्हे पैसे देऊन केलेले असावेत असा अंदाज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केला. राज ठाकरे  मुंबईत 'वार्तालाप' कार्यक्रमात पत्रकारांशी संबोधित केले.
 
'माझे स्वप्न मी व्हिजन डॉक्युमेंटमधून मांडले आहे. ते सहज शक्य आहे. तसेच राज्य चालवताना पैसा खाणे बंद केल्यास सर्व गोष्टी आपोआप सुरळीत व्हायला सुरुवात होईल, असे राज ठाकरे म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचा खर्‍या अर्थाने विकास केला आहे. त्याचप्रमाणे इतरही अनेक नेत्यांनी विकासात हातभार लावला आहे. पण गेल्या 15 वर्षांत महाराष्ट्राचा विकास थांबला आहे. येथील राज्यकर्त्यांच्या भांडणात विकासाची गती मंदावली आहे.
 
लोकसभा निवडणूक एका वेगळ्या पद्धतीने लढवली गेली. त्यामुळे या निवडणुकीत मुद्दे वेगळे होते. त्यात लोकसभा निवणूक लढवायला पाहिजे तसा उत्साह देखील मला नव्हता. त्यामुळे अशा परिस्थितीत निकालाने फार फरक पडत नसतो. 
 
सध्या सुरू असलेले सर्व्हे पैसे देऊन केलेले किंवा हवेतील गप्पा आहेत. त्याचे कारण म्हणजे सध्याची स्थिती पाहता, निवडणुकीत काय होणार हे कोणीही सांगू शकत नाही. पण युत्या आघाड्यांच्या राजकारणातून राज्य बाहेर यायला हवे. त्यासाठी एका पक्षाच्या हाती सत्ता द्यायला हवी.