Last Modified: ठाणे , बुधवार, 15 ऑक्टोबर 2014 (11:26 IST)
चार मतदान यंत्रे सापडली निवडणूक अधिकार्या घरी
ठाणे जिल्ह्यातील वसईत मतदार संघात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. चार मतदान यंत्रे अर्थात ईव्हीएम चक्क निवडणूक अधिकार्याच्या घरी सापडल्याने खळबळ उडाली आहे. अशोक मांद्रे असे या अधिकार्याचे नाव आहे.
क्षेत्रीय अधिकारी असलेले मांद्रे यांनी आपल्या राहत्या घरी ही मतदान यंत्रे ठेवली होती. विशेष म्हणजे ही यंत्रे मध्यरात्री दोनच्या सुमारास आपल्या पत्नीसह शासकीय कार्यालयात घेवून जायाला ते निघाले. त्याचवेळी वसईचे आमदार विवेक पंडीत यांनी धाव घेतली आणि निवडणूक निर्णय अधिकार्यांना फोन करून बोलावून घेतले.
दरम्यान, तहसिलदारांनी चारही यंत्रांचा पंचनामा करून, त्या ताब्यात घेतल्या आहेत. मांद्रे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.