मतदानाच्यावेळी विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, रामटेकमध्ये मतदानाला अल्प प्रतिसाद. सावनेर येथे मतदान केंद्रांवर वीज कोसळून १० जण जखमी झाले. पारशिवनीत आवडेघाटातील मतदान केंद्रावरील दुर्घटना झाल्याचे वृत्त आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये केले मतदान तसेच काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमध्ये कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजपा सरकार सत्तेवर येणार - पंकजा मुंडेनी असा विश्वास व्यक्त केला आहे.