Last Modified: पुणे , शनिवार, 11 ऑक्टोबर 2014 (10:43 IST)
राज्याबद्दल तळमळ नसलेल्यांना निवडून देऊ नका- राज
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून येणार नाहीत राज्याचा कारभार तुम्हा-आम्हालाच चालवायचा आहे. राज्याबद्दल तळमळ नसलेल्यांना निवडून देऊ नका, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरयांनी मोदींवर टीका केली.
राज्यात भाजपने तब्बल 60 नेते आयात केले आहेत. राज्यभर फिरणार्या नेत्यांसोबत मोदी येतील आणि जातील परंतु राज्य तुम्हा-आम्हाला पाहायचे आहे. विशेष म्हणजे भाजपची ही जुळवाजुळवी योजनाबद्ध असल्याचा टोलाही राज ठाकरे यांनी पुण्यातील प्रचारसभेत लगावला.