शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. चंद्रावर पाणी
Written By वेबदुनिया|

चांद्रयान-2 खोदणार चंद्रावरचे पाणी

चांद्रयान -1 ने चंद्रावरील पाण्याचा अंश शोधून काढल्यानंतर आता चांद्रयान- 2 यावरील पाणी जमवण्यासाठी खोदकाम करणार आहे. चांद्रयानचे नवीन डिझाइन यापूर्वीच इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी तयार केले आहे.

चांद्रयान एक दोन वर्षांच्या कालावधीपूर्वीच बिघडल्यानंतर वैज्ञानिक निराश झाले होते, परंतु चंद्रावरील पाण्याचा अंश भारतीय वैज्ञानिकांनी शोधून काढल्यानंतर आता त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.

चांद्रयान-2 लवकरच पाठवण्याची तयारी करण्यात येत असून, पाण्याचा काही अंश आणण्यासाठी चांद्रयान-2 चंद्रावर खोदकाम करणार असल्याचे इस्रोच्या वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.