अँटी ग्रॅव्हिटी योगा : उलटे लटका, हेल्दी राहा..
फिट व फाइन राहण्यासाठी योगा हा पारंपरिक व सर्वात फायदेशीर मार्ग आहे. शेकडो वर्षापूर्वी याच माध्यमातून अनेक आजारांचा उपचार होत आला आहे. यात बरेच संशोधनदेखील झाले. त्यातूनच एक अँडव्हान्स रूप अँटी योगा ग्रॅव्हिटी नावाचा प्रकार पुढे आला आहे. जगभरातील अनेक शहरात तो वेगाने लोकप्रिय होताना दिसत आहे. यात रेशमी किंवा सुती कपडय़ांचा एक झोका तयार केला जातो व त्यावर उलटे लटकून (एंगेस्ट दास ग्रॅव्हिटी) आसने करावी लागतात. योगाच्या या फॉर्मची सुरुवात 1990 मध्ये झाली होती.