गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योग सल्ला
Written By वेबदुनिया|

व्यायाम करताना हे जरूर लक्षात ठेवावं

PR
व्यायाम करण्याच्या खोलीत भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश हवा.
व्यायाम करताना मधून मधून पाणी पिणं गरजेचं आहे.
कोणताही व्यायाम करताना शरीर एका रेषेत सरळ ठेवावं.
कोणताही व्यायाम करताना श्‍वास थांबवून, श्‍वासाची गती एकदम कमी करून अथवा वाढवून तो करायचा नाही. श्‍वासोच्छवासाची गती व्यायामादरम्यान सामान्य असावी.
खास शरीराच्या खालच्या भागासाठींचे हे व्यायामप्रकार करण्याआधी ‘कार्डिओ एक्सरसाइज’ केल्यास व्यायामाचे चांगले परिणाम मिळतात.
व्यायामादरम्यान जेवढं अंतर दोन पायात ठेवून उभं राहण्याची सूचना केली आहे तेवढं अंतर जरूर ठेवावं.
लोअर बॉडीचे हे व्यायामप्रकार घोट्यांना ‘अँकल वेटस’ वापरूनही करता येता. अर्धा ते पाच किलो वजनाचे हे ‘अँकल वेटस’ खेळाच्या दुकानात मिळतात. सुरूवातीला कमी वजनाची ‘अँकल वेटस‘वापरावीत. नंतर सरावानं जास्त वजनाची वापरता येतात.
कोणताही व्यायाम हेलकावे देत किंवा अगदी मजेनं, अळमटळम करत करायचा नसतो. व्यायाम ही शिस्तीनं करण्याची बाब आहे. तो शिस्तीनंच करायला हवा. शिस्त मोडल्यास व्यायामादरम्यान इजा होऊन स्नायू दुखावू शकतात. व्यायामाचा उद्देश स्नायूंना स्वस्थ ठेवण्याच्या असतो, स्नायूंना दुखावण्याचा नसतो.