सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By

Yoga: दंडासनचे फायदे, करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

योग हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असतो. योग मुळे अनेक प्रकरच्या शारीरिक समस्यांपासून सुटका मिळू शकते. दंडासनला स्टाफ पोज देखील संबोधले जाते. हे आसन करतांना एक सरळ स्थितीत पाठ ठेवायची आवश्यकता असते. दंडासनचा योग्य अभ्यास करून दंडासनचे फायदे जाणून घ्या. 
 
दंडासनचे फायदे-
पाठीच्या मांसपेशींना मजबूत बनावतो.  
शरीराच्या मुद्रामध्ये सुधारणा होते.  
पाठीचा कणा संबंधित समस्या दूर होते. 
हे आसन एकाग्रता वाढवायला मदत करते. 
अस्थमाच्या आजरापासून दंडासन योगाभ्यास हा वाचवतो.
पाचन संस्था सुरळीत होते.  
मेंदूला निवांत करतो. 
साइटिकापासून आराम मिळतो.   
 
दंडासन करण्याची योग्य पद्धत- या आसनाच्या अभ्यासासाठी जमिनीवर बसून पाय पुढे पसरवा. जेवढे होतील तेवढे पाय अजुन सरळ करण्याचा प्रयत्न करा. पाय एकमेकांसोबत ठेऊन निवांत करा. मांडीच्या माँसपेशींमध्ये ताण जाणवेल. मग खांद्यांना कुल्ल्यावरती नेऊन पाठीला सरळ ठेवा. यासाठी कोपरची मदत घ्यावी. तळहात कुल्ल्यांच्या दोन्ही बाजूंनी फर्शीवर टेकवा. श्वास घ्या व पाठ सरळ ठेवा. काही वेळ या अवस्थेत थांबा . 
 
सावधानता- जर तुमच्या  मनगटाला दुखापत झाली असेल तर हे आसन करू नये. पाठीच्या खालच्या बाजूला दुखत असेल किंवा लागले असेल तर हे आसन करू नये अभ्यास करतांना शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त जोर लावू नये. दंडासन करण्यापूर्वी अधोमुख श्वानासन आणि उत्तानासन करावे. मग दंडासन नंतर पूर्वोत्तानासन आणि भारद्वाज ट्विस्टचा अभ्यास करणे.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik