शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2023
Written By
Last Updated : गुरूवार, 15 डिसेंबर 2022 (09:18 IST)

सोने खरेदी करण्यासाठी वर्ष 2023 चे शुभ मूहुर्त

gold
Shubh Muhurat to Buy Gold in the year 2023
आपल्या देशात सोन्यात निवेश करणे सर्वात सुरक्षित पर्यांयापैकी एक मानले गेले आहे. साधारणपणे सोन्यात गुंतवणूक केल्याने लोकांना फायदाच होतो. तरी आपल्या येथील लोक आजही सोन्याचे दागिने तयार करुन घालण्यात अधिक महत्तव देतात. सोनं हे मौल्यवान धातू असून त्याला लक्ष्मीचे रुप देखील मानलं जातं. हेच कारण आहे ज्यामुळे आजही अनेक घरांमध्ये सोने घेण्यापूर्वी शुभ मुहूर्त बघतात. येथे आम्ही  वर्ष 2023 मध्ये सोने खरेदी करण्यासाठी शुभ दिवसांची यादी देत आहोत-
 
सोने शुभ मुहूर्तावर का खरेदी केलं जातं ?
ज्योतिषांच्या मते जर एखादी वस्तू जास्त किंमतीची असेल आणि तिच्याशी खूप मोठी किंमत मोजावी लागत असेल तर ती एखाद्या शुभ दिवशी किंवा शुभ मुहूर्तावर खरेदी करावी. प्रत्येक हिंदू कॅलेंडरमध्ये दिवसाचा असा एक कालखंड असतो, ज्याला राहु काल असे म्हणतात. राहू हा अशुभ ग्रह मानला जातो. राहुकालमध्ये राहूची घातक ऊर्जा सर्वात शक्तिशाली असते. यावेळी कोणतीही शुभ वस्तू खरेदी करणे योग्य मानले जात नाही. 
 
वर्ष 2023 मध्ये सोने खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त
वर्षात सर्व शुभ वेळ हा दिवाळी असतो. आपल्या येथील परंपरेनुसार हा सण लक्ष्मी देवीला आपल्या घरी आमंत्रित करुन त्यांच्याकडून धन- समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा सण आहे. दिवाळीच्या आधी धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.
 
2023 मध्ये सोने खरेदीसाठी हे सर्वात शुभ दिवस आहेत-
मकर संक्रांती - 14 जानेवारी 2023
गुढी पाडवा - 22 मार्च 2023
अक्षय तृतीया- 22 एप्रिल 2023
नवरात्री - 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2023
विजयादशमी - 24 ऑक्टोबर 2023
धनत्रयोदशी / दिवाळी - 10 आणि 12 नोव्हेंबर 2023
बलिप्रतिपदा / दिवाळी पाडवा - 13 नोव्हेंबर 2023
 
पुष्य नक्षत्र 2023 Pushya Nakshtra 2023
पुष्य नक्षत्र ज्योतिष नक्षत्रांपैकी एक आहे. ज्योतिषांच्या मते पुष्य नक्षत्राच्या दिवशी एक विशिष्ट कालावधी आर्थिक व्यवहारासाठी अतिशय शुभ आहे. त्यामुळे या काळात लोक विविध कारणांसाठी सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतात. पुष्य नक्षत्र हे वर्षभर विविध दिवसांवर येते, त्यामुळे तुम्ही 2023 मध्ये सोने खरेदीसाठी सर्वात शुभ वेळ निवडावी.
 
वर्ष 2023 मध्ये पुष्य नक्षत्र तिथी:
8 जानेवारी 2023
4 फेब्रुवारी 2023
3 मार्च 2023
30 मार्च 2023
27 एप्रिल 2023
24 मे 2023
20 जून 2023
18 जुलै 2023
14 ऑगस्ट 2023
10 सप्टेंबर 2023
7 ऑक्टोबर 2023
4 नोव्हेंबर 2023
1 डिसेंबर 2023
29 डिसेंबर 2023