शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

200 फायटर जेट्स हवाई दलात येणार

भारताच्या हवाई दलात लढाऊ विमानांची कमतरता भासू नये, यासाठी केंद्र सरकार लवकरच 200 फायटर जेट्स विमाने खरेदी करणार असल्याची संरक्षण सचिव अजय कुमार यांनी आज कोलकाता येथे दिली.
 
हवाई दलात गेल्या काही दिवसांपासून फायटर जेटची संख्या कमी झालेली आहे. ही कमतरता भरुन काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे ते म्हणाले. तसेच हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेडकडून तयार करण्यात येत असलेल्या 83 लढाऊ विमानांचे कंत्राट शेवटच्या टप्प्यात असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले.