रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑगस्ट 2019 (10:32 IST)

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंविरोधात अटक वॉरंट

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात सोलापूर न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं आहे. शासकीय कामात अडथळा आणण्या प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याबद्दल त्यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे.  
 
हे प्रकरण 2018 मधील आहे. 2 जानेवारी 2018 रोजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
 
या बैठकीदरम्यान प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय उपचारासंदर्भात झालेली दरवाढ रद्द करा, अशी घोषणाबाजी करत पालकमंत्र्यांना घेराव घातला होता.
 
याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.