बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (17:51 IST)

नासाच्या पर्सिव्हिअरन्सने मंगळाच्या पृष्ठभागावर केला शोध सुरू

नासाने अंतराळात पाठवलेल्या पर्सिव्हिअरन्स यानाने मंगळावर विविध गोष्टींचा शोध करायला सुरुवात केली आहे.
 
नासाने दिलेल्या माहितीनुसार, रोव्हर खूप दूर गेलेलं नाही. त्याने आतापर्यंत 6.5 मीटर म्हणजे 21 फुटांचं अंतर पार केलं आहे. नासाचे ज्येष्ठ वैज्ञानिक स्टॅक मॉर्गन यांनी हे महत्त्वपूर्ण यश असल्याचं म्हटलं आहे.
 
पर्सिव्हिअरन्स रोव्हरला अजून अनेक तांत्रिक अडथळ्यांना पार करायचं आहे. मात्र जशी रोव्हरची रबरी पातं फिरू लागतील, तसं मंगळाचा शोध घ्यायला सुरुवात केली असं म्हणता येईल.
 
अमेरिकेच्या नासातर्फे मंगळावर उतरवण्यात आलेलं हे दुसरं एक टनी वजनाचं रोव्हर आहे. पर्सिव्हिअरन्स हे मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलेलं सगळ्यात वेगवान रोव्हर आहे.
 
पर्सिव्हिअरन्स पुढच्या आठवड्यात मंगळ ग्रहाची मुशाफिरी करून आणखी छायाचित्रं पाठवेल जेणेकरून शास्त्रज्ञांना मंगळाचा सर्वसमावेशक पद्धतीने अभ्यास करता येईल.
 
गुरुवारी (4 मार्च) रोव्हरने काही अंतर पार केलं, त्यानंतर त्याने दीडशे डिग्री वळण घेऊन ते पुन्हा आपल्या जागी परत आलं.
 
यासंदर्भात बोलताना रोव्हरच्या मोबिलिटी इंजिनियर एनाइस जारिफियन म्हणाल्या, "... खुणा इतक्या चांगल्या नव्हत्या जितक्या या रोव्हरच्या पाऊलखुणा आहेत.
 
या मोहिमचे हे एक मोठं यश आहे. आमची टीम यासंदर्भात खूश आहे. किती वर्ष कितीतरी लोकांनी या क्षणाची प्रतीक्षा केली असेल".
 
19 फेब्रुवारीला नासाचं पर्सिव्हिअरन्स रोव्हर मंगळावर उतरलं होतं. सात महिन्यांपूर्वी रोव्हरने पृथ्वीवर उड्डाण केलं होतं. मंगळापर्यंत पोहोचण्यासाठी रोव्हरने 50 अब्ज किलोमीटरचं अंतर पार केलं.
 
मंगळावरच्या पूर्णपणे कोरड्या स्थितीतील तलावातील जमिनीचं परीक्षण करण्याचं काम रोव्हर करेल. कोट्यवधी वर्षांपूर्वी मंगळावर कुठल्याही स्वरुपाची वस्ती होती का याचा अभ्यास करून तपशील पृथ्वीकडे पाठवण्यात येईल.
 
1970 नंतर नासाची मंगळाचा अभ्यास करण्यासाठी यान पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
रोव्हर मंगळावर दोन वर्षांसाठी असणार आहे आणि 15 किलोमीटरचं परीक्षण केलं जाईल, असं नासाने स्पष्ट केलं.
 
मंगळावर कमी वजनाचं एक हेलिकॉप्टर उडवण्याचं रोव्हरचं उद्दिष्ट आहे.
 
पर्सिव्हिअरन्स स्वत:बरोबर छोटं हेलिकॉप्टरही घेऊन गेलं आहे. रोव्हर हे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न करणार आहे. पृथ्वीव्यतिरिक्त अन्य ग्रहावर अशा प्रकारे उड्डाण करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.