रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 26 एप्रिल 2020 (16:25 IST)

लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी अद्याप निर्णय नाही - राजेश टोपे

राज्यात 18 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून येत आहे. मात्र, अद्याप तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.  
 
हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिथिलता येणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
 
"देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. अशात राज्यासाठी एक सकारात्मक बातमी आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच वेग मंदावला आहे. महाराष्ट्रात डबलिंग रेट हा तीन दिवसांवरुन सातवर गेला आहे," असंही ते म्हणाले.
 
आपल्या राज्यात देशातील सर्वाधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत देशात एक लाखाहून अधिक कोरोना चाचण्या झाल्या असल्याची माहिती टोपे यांनी दिली.