बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

निर्भया खटल्यातील दोषीची याचिका फेटाळली, वकिलांना 25 हजारांचा दंड

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी निर्भया खटल्यातील एका दोषी व्यक्तीची याचिका फेटाळली. आपण या घटनेच्यावेळेस अल्पवयीन होतो अशी याचिका केली होती. आता इतक्या उशिरा अशी याचिका करू शकत नाही असे म्हणत कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.
 
खटल्यामध्ये वेळकाढूपणा करून वेळ वाया घालवल्याबद्दल या दोषीचे वकील ए. पी. सिंह यांना न्यायाधीश सुरेश कैत यांनी 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्यांच्यावर बार कौन्सीलने कारवाई करावी असेही न्यायाधीशांनी आदेश दिले आहेत.