गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

कवयित्री अनुराधा पाटील, शशी थरुर यांना साहित्य अकादमी पुरस्कार

ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनही' या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 23 भाषांसाठी अकादमीने वर्ष 2018चे पुरस्कार जाहीर केले. त्यामध्ये सात कवितासंग्रह, सहा कथासंग्रह, तीन निबंध, एक कथेतर गद्य, आत्मचरित्र यांचा समावेश आहे.
 
गोव्यातील कोकणी कवी निलबा खांडेकर यांच्या कवितासंग्रहालाही पुरस्कार जाहीर झाला आहे. काँग्रेसचे खासदार आणि लेखक शशी थरुर यांना 'अॅन एरा ऑफ डार्कनेस' या पुस्तकाला पुरस्कार जाहीर झाला आहे.