सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 3 डिसेंबर 2019 (15:14 IST)

घरगुती सिलेंडरच्या किंमतीत सलग चौथ्या महिन्यात वाढ

घरगुती सिलेंडरच्या (LPG) किंमती पुन्हा वाढल्या आहेत. या सिलेंडरचे दर नवी दिल्लीत 13.5 रूपये, तर मुंबईत 14 रूपयांनी वाढवण्यात आले आहेत. लाईव्ह मिंटनं ही बातमी दिलीये.
 
दरवाढीमुळं विनाअनुदानित सिलेंडरचे दर दिल्लीत 695 रूपये, मुंबईत 665 रूपये, चेन्नईत 714 रूपये, तर कोलकात्यात 725 रूपये होतील.
 
 
गेल्याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये एलपीजी सिलेंडरमध्ये 76 रूपयांनी वाढ झाली होती. त्याआधी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात प्रत्येकी 15 रूपयांनी वाढ झाली होती.
 
भारतातल्या एलपीजी सिलेंडरच्या किंमती या एलपीजीचा इंटरनॅशनल बेंचमार्क रेट आणि अमेरिकन डॉलर यावर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या दरांचा आढावा घेऊन सरकारी इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सुधारित किंमत जाहीर करत असतात.