रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 2 सप्टेंबर 2019 (09:34 IST)

सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो : नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सरकारी कामाच्या पद्धतीवर टीका केली आहे.
 
"सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो. म्हणून मी कधीच माझ्या कोणत्या कामासाठी सरकारकडे मदत मागत नाही," असं वक्तव्य करून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी पुन्हा चर्चेत आले आहेत.  
 
नागपुरात मदर डेअरीच्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "संत वामन पै यांनी 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे' असा संदेश दिला होता. तेव्हापासून मी सरकार आणि देवावर अवलंबून राहणं सोडून दिलं. मी कधीच सरकारकडे मदत मागायला जात नाही. एक मदर डेअरीचा अपवाद सोडला तर आपल्याकडं सरकार जिथं हात लावतं तिथं सत्यानाशच होतो.
 
"सरकारने काही चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक पण करतो. मात्र, मी कधीही सरकारकडं मदत घेत नाही. मी लोकांनाच काम करायला सांगतो," असं गडकरी पुढे म्हणाले.

"परदेशात गेल्यावर तिथं भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोललं जातं. हे ऐकून माझी मान शरमेनं खाली झुकतं. जोवर हे थांबत नाही, तोवर मी काम करत राहणार," असंही ते म्हणाले.