गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (15:08 IST)

तुमचं डोकं ठिकाण्यावर तरच तुमचं आरोग्य ठिकाण्यावर

क्लाउडिया हॅम्मड
तुम्ही किती व्यायाम करता ते महत्त्वाचं नाही, पण आपल्या मित्रमंडळींच्या व्यायामासोबत आपला व्यायाम पडताळून बघण्याचा परिणाम आपल्या फिटनेसवर होत असतो.
 
नवीन वर्षात व्यायाम आणि आहाराचं काटेकोरपणं पालन करणार, असा निश्चय अवघ्या चौथ्या दिवशीच अयशस्वी ठरला असेल तरी त्यामुळे न खंतावता आपल्या व्यायामाकडं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. नवीन संशोधनानुसार लोकांची मानसिकता आणि त्यांचं आरोग्य या दोहोंत दुवा असल्याचं आढळून आलं आहे. काही लोक त्यांच्या शारीरिक क्रियाशीलतेबद्दल फारच नकारामत्मक भावना उरात बाळगतात, तर काही कधीकधी विचार करतात की, `ते अक्षम आहेत.`
 
अमेरिकेतील स्टॅण्डफोर्ड युनिर्व्हसिटीमध्ये शास्त्रज्ञांनी 61,000 प्रौढांच्या माहितीचा सखोल अभ्यास केला. 21 वर्षांतल्या डझनावारी लक्षणीय गोष्टींची नोंद घेतली. या नोंदीत लोक किती व्यायाम करतात, त्यात कुशलता किती आहे, त्यांच्या वयाच्या इतर व्यक्तींच्या तुलनेत त्यांच्या मते ते कितपत व्यायाम करतात, या व्यक्तींपैकी कितीजणांचा कोणकोणत्या आजारांनी आणि वयाच्या कितव्या वर्षी मृत्यू झाला आदी मुद्द्यांचा समावेश होता.
 
या संशोधनात सहभागी झालेल्यांच्या आरोग्याची कारणमीमांसा करताना विविध घटकांचा विचार करण्यात आला. त्यावेळी संशोधकांना एक विलक्षण गोष्ट आढळून आली. आपल्या समवयस्क लोकांइतका व्यायाम आपण करत नाही, असा विचार काही लोकांनी केला होता, त्यांचे ते समवयस्कच तरुण वयात मृत्यू पावले होते. खरंतर दोन्ही प्रकारच्या सहभागींनी समान प्रकारे व्यायाम केला होता.
 
व्यायाम केल्यामुळं तुम्हाला एक अपेक्षित अशी आयुमर्यादा लाभते हे खरं, पण या अभ्यासानुसार असं दिसलं की, सहभागींच्या व्यायामाप्रती असलेल्या दृष्टिकोनातही फरक होता.
स्टॅण्डफोर्ड युनिर्व्हसिटीच्या ऑक्टाव्हिया झार्ट यांनी मला त्यांचा वैयक्तिक अनुभव उदाहरणादाखल सांगितला. त्यांनी कॅलिफोर्नियातील ग्रॅज्युएट स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यावर त्यांना सतत जिमला जाणारी-येणारी माणसं दिसायची. ही माणसं व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जात असत किंवा व्यायाम करून येत असत. त्या स्वतः लंडनमध्ये असताना स्वतःला एकदम फिट समजायच्या. सायकलिंग करायच्या, व्यायाम करायच्या. पण या माणसांपैकी समवयस्कारांसोबत त्यांनी स्वतःची तुलना करून पाहिली आणि निश्चितपणे त्या स्वतःला अनफिट समजू लागल्या होत्या.
 
त्यांना स्वतःलाही आश्चर्य वाटलं की, कसंही असलं तरी इतरांच्या मानानं कमी क्रियाशील वाटण्याच्या मानसिकतेमुळं कदाचित आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो? - आणि त्यांचा हा कयास योग्य ठरला.
 
ज्या सहभागींनी आपण समवयस्कांपेक्षा कमी क्रियाशील आहोत, असा समज करून घेतला होता त्यापैकी 71 टक्के सहभागींच्या मृत्यूचा धोका वाढला होता. त्यांची तुलना आपण इतरांपेक्षा जास्त व्यायाम करतो असा समज असणाऱ्या सहभागींशी केली गेली.
 
व्यायामाचा आरोग्यावर होणारा परिणाम
झार्ट यांचा हा दावा मोठा विलक्षण भासतो, पण या सहभागींचा व्यायामाचा त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची किमान तीन कारणं असणं शक्य आहे.
 
पहिलं कारण अगदी उघडपणे आपल्याला दिसतं आहे की, त्यांनी आपण इतरांच्या मानानं कमी क्रियाशील आहोत, याच विचारावर अधिक भर दिला होता. एका अर्थी या नकारात्मकतेचा परिणाम शरीरावर झाला आणि त्याच वेळी ते पाहून इतर लोक कायम व्यायाम करत असावेत, असे मनोमन आडाखे बांधत राहिले. त्यामुळं त्यांच्या जिवाला घोर लागला आणि त्या अतिताणामुळं तब्येत खालावत राहिली.
 
किंवा मग त्यांना व्यायाम करण्यासाठी एखादा प्रेरणादायी हेतू मिळाला नसावा का?
 
कदाचित त्यांच्या मनात आपण क्रियाशील आहोत, अशी स्वप्रतिमा तयार झाली असेल आणि आपण आणखी सशक्त व्हायला हवं, या विचारापोटी व या स्वप्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून ते अतिव्यायाम करत असतील. या कल्पनेसाठी 2015मध्ये झालेल्या संशोधनाचा आधार घेता येईल. त्यानुसार आपण आपल्या मित्रांपेक्षा कमी क्रियाशील आहोत, असा समज करून घेतल्यास त्यानंतरच्या काळात आपलं योग्य प्रमाणात व्यायाम करण्याचं प्रमाण कमी होतं.
या संशोधनात सखोल विचारांती एक आश्चर्याची गोष्ट कळली की, एखाद्या गटात असताना आपलं आचरण कसं असावं किंवा आपल्यापैकी बऱ्याचजणांची मानसिकता इतर लोकांचं काय चाललं आहे, ते जाणून घ्यायची असते. मात्र आपलाच मित्र किंवा मैत्रीण आपल्यापेक्षा चांगली कामगिरी करत आहेत, हे कळल्यावर आपण निराश होतो आणि त्याविषयीच्या कल्पनांच्या आहारी जातो.
 
तिसरं कारण प्लासिबो इफेक्टसारखं काम करताना दिसतं. एखादी वेदनाशामक गोळी घेतली की बरं वाटतं, ही मानसिकता आता प्रस्थापित झाल्यानं त्या समजाचा प्रभाव व परिणाम शरीरावर निश्चितपणं होतो.
 
त्याउलट अर्थात नकारात्मक अपेक्षांच्या ओझ्यामुळं मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच कदाचित आपल्या समवयस्करांप्रमाणं क्रियाशील असणारे पण त्याबद्दलच्या विचारांत सुस्पष्टता न आल्यानं या त्यांना प्लासिबो इफेक्टसमान भासणाऱ्या या गोष्टीचा फायदा झालेला दिसत नाही.
 
हॉटेलच्या हाऊसकिपरचंच (सेवकवर्ग) उदाहरण घ्या ना. त्यांची रोजची कामं म्हणजे व्यायामच. मग ते हॉटेलच्या भल्यामोठ्या कॉरिडॉरमधून सतत वर-खाली ये-जा करणं असो, भल्याथोरल्या ट्रॉलीज ढकलणं असो बाथरूम घासणं, केर काढणं, बेडशीट बदलणं वगैरेवगैरे. पण 2007मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार त्यांना स्वतःला ही सगळी कामं म्हणजे व्यायाम असं वाटत नव्हतं. तेव्हा स्टॅण्डफोर्ड युनिर्व्हसिटीच्या अलिया क्रम यांनी यातल्या अर्ध्या हाऊसकीपरना ते किती आणि केवढा व्यायाम करत आहे नि तो त्यांच्या कसा फायद्याचा ठरतो आहे ते सांगितलं.
 
चार आठवड्यांनंतर या गटातल्या हाऊसकिपरचं वजन आणि रक्तदाब कमी झाला. त्यांनी सजग मानसिकतेनं कामाकडं व्यायाम म्हणून पाहायला सुरुवात केल्यावर त्यांच्या शरीरावरही तसा परिणाम झाला. कदाचित ते अधिक जोमदारपणं केर काढायला लागले असतील किंवा मग तो प्लासिबो इफेक्टसारखा परिणाम असू शकेल.
 
हे सगळं सांगताना आठवण होते आहे 2003मध्ये झालेल्या अभ्यासाची. त्यातले सहभागी समवयस्क होते आणि त्यांच्या आरोग्यावर या गोष्टीचा परिणाम झाला का, याची चाचपणी केली गेली. या अभ्यासात 7000 सेवकांचं मध्यम वय संपून त्यांचं म्हातारपण सुरू होण्याच्या कालावधीत हा अभ्यास झाला. हॅना कूपर आणि प्रोफेसर सर मायकेल मरमॉट यांनी यामागची कारणमीमांसा केली. तेव्हा त्यांना आढळलं की, म्हातारपण 60व्या वर्षी किंवा त्याहून कमी वयात सुरू होतं, त्यांना हृदयाशी संबंधित विकाराचा धोका निर्माण झाला तर उरलेल्यांनी म्हातारपण 70व्या वर्षी किंवा त्याहून अधिक वयात सुरू होतं, असा विचार केला होता.
 
वरवर साध्याशा वाटणाऱ्या लोकांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दलच्या प्रश्नातच आपल्याला उत्तर गवसतं आहे. कदाचित त्यांचं उत्तर असेल की, वयाच्या 60व्या वर्षी म्हातारपण सुरू होतं, कारण त्यांना स्वतःच्या अनारोग्यामुळं म्हातारं झाल्यासारखं वाटलं असू शकतं. किंवा मग कदाचित त्यांना त्याखेरीज काही असू शकतं असं वाटलं नसावं आणि त्यांनी व्यायाम करणं थांबवलं असावं आणि त्याचाच त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला असावा. किंवा कदाचित त्यांना म्हातारपणाच्या संध्याछायांमुळे चिंता वाटली असेल आणि त्यामुळे ताण वाढून त्याचा तब्येतीवर परिणाम झाला असेल.
 
हे वाचता वाचता तुमच्या लक्षात आलं असेल की, या तीनही शक्यतांच्या स्पष्टीकरणाची तुलना करता पहिल्या अभ्यासात सांगितल्यानुसार मित्रांच्या व्यायामाशी स्वतःच्या व्यायामाची तुलना करणं ही बाब होती. आपल्याला सगळी उत्तरं मिळाली आहेत, अशात भाग नव्हे पण इथं काहीतरी चित्तवेधक गोष्ट घडते आहे आणि एकेक टप्पे पार करताना कळतं आहे की सहभागींचं आरोग्य आणि त्यांचा फिटनेस या गोष्टींमुळं फरक पडू शकतो.
 
यामुळं आरोग्य अधिकाऱ्यांची परिस्थिती मोठी अवघड होते. आपण किती व्यायाम केला की आपण फिट राहू शकतो, हे आणि इतकंच त्यांना कळणं अपेक्षित असतं. तर दुसऱ्या बाजूला या संशोधनासारखी संशोधनं सुचवतात की, अतिउच्च ध्येय ठेवलं तर ते गाठताना नैराश्य अर्ध्या वाटेत गाठू शकतं. अर्थात एखाद्या गोष्टीचा परिणाम साधायचा मार्ग कोणता आहे, हे कळल्याशिवाय, आयुष्याकडून काही अपेक्षा ठेवल्यानं फार मोठा फरक पडतो आणि त्यामुळंच या ना त्या मार्गानं धडपड करणं आपण सोडत नाही.
 
दरम्यान मी एक मध्यममार्ग शोधून काढला आहे की, भोवतालच्या क्रियाशील व्यक्तींची धडपड समजून घेऊन त्यांची प्रशंसा करायची आणि शहाणपणाचा आव आणून व्यायाम करणाऱ्या नि अल्ट्रा मॅरेथॉन धावणाऱ्या मित्रमंडळींच्या संभाषणात सहभागी होणं टाळायचंच!