सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बिहार विधानसभा निवडणूक 2020
Written By
Last Updated : बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (15:20 IST)

बिहारमध्ये गुप्तेश्वर पांडे आणि शिवसेनेत सामना रंगणार

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना गुप्तेश्वर पांडेच्या विरोधात लढणार आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला लागून आलेल्या बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये शिवसेनेची बदनामी करण्यात आली. बिहारचे माजी पोलीस संचालक यांनी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर अविश्वास दाखवला होता. बिहार निवडणुकीत शिवसेना ५० उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितलय.
 
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गुप्तेश्वर पांडे यांनी सेवानिवृत्ती घेत जेडीयूमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पांडेंच्या महाराष्ट्र सरकारविरोधातली भूमिका केवळ आकसापोटी असल्याची शंका शिवसेना नेत्यांनी व्यक्त केली. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात झालेल्या बदनामीनंतर शिवसेना वचपा घेण्यासाठी सज्ज झाली आहे. २०१५ मध्ये शिवसेनेनं ८० जागा लढवत २ लाखांपेक्षा जास्त मत घेतली होती. यंदा शिवसेना ५० जागा लढवून इतर पक्षांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे.