अभिनेता सैफ अली खानविरुद्ध आरोप निश्चित
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या दोन मित्रांवर किल्ला कोर्टात मारहाणप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. कलम 334 आणि 35अंतर्गत हे आरोप निश्चित करण्यात आले.
सैफ़ अली खान आणि त्याचे दोन मित्र बिलाल आमरोही आणि शकील लड़ाख या तिघांनी 22 फेब्रुवारी 2012 रोजी ताज हॉटेलमध्ये आलेल्या इक्बाल शर्मा या व्यक्तीला मारहाण केली होती. त्यावेळी करीना कपूर, करिश्मा कपूर आणि मलायका अरोरा, सैफ़ अली खान सोबत होत्या. इक्बाल शर्मा यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात सैफ विरूद्ध गुन्हा दाखल केला होता.
कुलाबा पोलिसांनी या प्रकरणी गुरुवारी कोर्टात आरोप पत्र दाखल केले.सैफ़ अली खान आज कोर्टात हजर राहिला होता. या प्रकरणाची पुढची सुनावणी 30 एप्रिलला आहे.