1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 26 जुलै 2014 (11:16 IST)

‘बँग बँग’ने प्रदर्शनाआधीचमोडले सर्व रेकॉर्ड

हृतिक रोशन आणि कॅटरिना कैफचा आगामी चित्रपट बँग बँगने प्रदर्शित होण्याआधीच विक्रम केला आहे. काल बँग-बँग चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. टीझर यू टय़ूबवर रिलीज होताच 24 तासात 28 लाख 19 हजार लोकांनी तो पाहिला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी अशा प्रकारचा विक्रम बॉलिवूडमधील कोणत्याही चित्रपटाला इतक्या मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद लाभलेला नाही. सिने रसिकांच्या या प्रतिसादामुळे बँग बँग टीमचा आनंद द्विगुणीत झाला आहे. बँग-बँगच्या टीझरला मिळणार्‍या प्रतिसादाबद्दल कॅटरिना कैमनेही आनंद व्यक्त केला आहे. हृतिक रोशनने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचे व्यक्तिगतरीत्या आभार मानले आहेत. तसेच प्रेक्षकांप्रति आपली कृतज्ञताही व्यक्त केली आहे. बँग बँगच्या प्रॉडक्शन टीममधील प्रत्येकाने या सिनेमाच्या निर्मितीसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळेच त्याला इतक्या मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद लाभल्याचं सिनेमाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी म्हटलं आहे.

बँग बँग 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिने रसिकांना पॉवर पॅक्ड अँक्शनचा थरारदेखील अनुभवायला मिळणार आहे. सिनेमाची निर्मिती करणार्‍या फॉक्स स्टार स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंग यांनी टीझरला माध्यमं, ट्रेड आणि डिजीटल माध्यमं यावर टीझरला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही सर्वजण रोमांचित झालो असल्याचं सांगितलं.