सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (15:02 IST)

तमिळ चित्रपट ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये आमिर खान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमिर खान सध्या “लालसिंग चढ्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच या चित्रपटाच्या शूटिंगमध्येही तो व्यस्त आहे. “लाल सिंग चढ्ढा’चित्रपटाची शूटिंग संपल्यावर तो तमिळ चित्रपट “विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची शूटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसेल, अशी चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये आहे.

विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकमध्ये आमिरसोबत आणखी एक खान दमदार भूमिकेत दिसणार आहे. तो म्हणजे बॉलिवूडच्या पतौडी खानदानाचा नवाब सैफ अली खान. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आमिर खानला विचारल्यानंतर सैफ अली खानला विचारले आहे. सैफ यात एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तमिळ व्हर्जन “विक्रम वेधा’ चित्रपटाला गायत्री पुष्कर दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आर.माधवन दिसला होता.