शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 27 ऑगस्ट 2018 (12:08 IST)

'लाइफ इन मेट्रो'च्या सिक्वेलधून अभिषेक व इलियानाची एंट्री?

2007 मध्ये प्रदर्शित झालेला अनुराग बासू दिग्दर्शित 'लाइफ इन मेट्रो' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. तब्बल अकरा वर्षांनंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. करिना कपूर, सैफ अली खान, राजकुमार राव या कलाकारांची या चित्रपटात वर्णी लागली आहे. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटात अभिषेक बच्चन व इलियानाचीही एन्ट्री होणार आहे. बर्‍याच काळापासून इलियाना चित्रपटांपासून लांब आहे. या बातमीला अद्याप या दोघांनीही दुजोरा दिला नाही, पण या चित्रपटाची स्क्रिप्ट त्यांना आवडली असल्याचेसूत्रांनी सांगितले आहे. या चित्रपटासाठी इलियानाही उत्सुक आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर दिग्दर्शक अनुराग बासू सध्या काम करत आहेत. 'लाइफ इन मेट्रो'चा हा सिक्वेल पुढील वर्षी प्रदर्शित होईल.