शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (12:46 IST)

अभिनेत्री आदिती राव हैदरी सिद्धार्थ लग्न बंधनात बंधले

Siddharth, Aditi rao hydari
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने तिचा मंगेतर सिद्धार्थसोबत आज 16 सप्टेंबर रोजी लग्नगाठ बांधली. दोघांनी मार्च मध्ये एंगेजमेंट केल्यावर चाहत्यांना सुखद धक्का दिला.आता त्यांनी आज लग्न केले आहे. त्यांनी लग्नाचे फोटो शेअर केले आहे. 

तिने तिच्या लग्नात पारंपारिक दक्षिण भारतीय लेहेंगा घातला होता. बेज रंगाच्या या लेहेंग्यात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. यासोबत तिने टिश्यू फॅब्रिकचा दुपट्टा कॅरी केला होता. तिच्या लेहेंग्यात खूप जड गोल्डन बॉर्डर असून लेहेंगा सुंदर आहे. यासोबतच अभिनेत्रीने कॅरी केलेल्या ब्लाउजवरही सोनेरी लेस लागलेली आहे. 

सुंदर दिसण्यासाठी ज्वेलरी देखील खास होती , तिने सोनेरी रंगाचे दागिने घातले होते, ज्यावर लाल रंगाच्या कुंदन जडल्या होत्या. त्यावर जडवलेले छोटे मोती अभिनेत्रीच्या सौंदर्यात भर घालत होते.तिने लग्नाच्या दिवशीही खूप हलका मेकअप केला होता. यासोबतच अभिनेत्रीने केसांची वेणी बांधून त्यावर गजरा बांधला होता. तिच्या लग्नाच्या दिवशी खूपच कमी मेहंदी लावली होती. 

तर सिद्धार्थने दक्षिण भारतीय पोशाखही निवडला. दक्षिण भारतातील पारंपारिक वेष्टी आणि कुर्तामध्ये सिद्धार्थ खूपच सुंदर दिसत होता. हे फोटो समोर आल्यानंतर सर्वजण नवीन जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. दोघांनी आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केले आहे. 
Edited by - Priya Dixit