गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2019 (09:25 IST)

कबीर खानच्या सिनेमात अदिनाथ कोठारेची निवड

कबीर खान दिग्दर्शित आगामी चित्रपट '८३'मध्ये दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिका साकारण्यासाठी अदिनाथ एम. कोठारे यांची निवड करण्यात आली आहे. आदिनाथ कोठारे यांनी सांगितले आहे की, "गेल्या वर्षी जुलैमध्ये असे घडले की, मी मराठीतील दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंग सपंवून परत आलो होतो. त्या चित्रपटात नायकची भूमिका असल्याने मला दाडीमिशा ठेवाव्या लागल्या होत्या. तेथील पुढे मी एका जाहिरातसाठी ऑडिशन दिले, पण ती जाहिरात मला मिळाली नाही. त्यानंतर '८३ ' या चित्रपटाचे ऑडिशन दिले. या ऑडिशनमध्ये मला दिलीप वेंगसरकर सरांचे अनुकरण करण्यास सांगितले होते. त्यांच्या देहबोलीची १५ मिनीटे तयारी करून ऑडिशन दिले. ते त्याना आवडले आणि माझे सिलेक्शन झाले. तो क्षण माझ्यासाठी जिंकण्यासारखा होता. कारण मला कबीर खानच्या चित्रपटात भूमिका मिळाली होती. तसेच मला भारतातील क्रिकेट प्रेमींच्या मनावर खोलवर टाकलेल्या क्षणांचे आणि एक व्यक्तीचे अनुकरण करण्याची संधी मिळाली आहे "
 
'८३' या चित्रपटात कपिल देव यांच्या मुख्य भूमिकेत रणवीर सिंह झळकणार आहेत. '८३' हा चित्रपट भारतीय क्रिकेटशी संबंधित सर्वात ऐतिहासिक घटनांपेकी एक आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत ही प्रदर्शित होणार आहे.