गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जुलै 2018 (00:22 IST)

अनिल-जुहीची जोडी पुन्हा झळकणार

बॉलिवूडमधील अनिल कपूर आणि जुही चावला ही हिट जोडी अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेयर करण्याच्या तयारीत आहे. हे दोन्ही सुपरस्टार कलाकार एक लडकी को देखा तो ऐसा लगा या चित्रपटात एकत्रित झळकणार आहेत. विशेष म्हणजे अनिल कपूरसाठी हा चित्रपट खूपच खास आहे. कारण यात तो फक्त आपल्या जुन्या को-स्टार सोबतच नव्हे, तर मुलगी सोनम कपूर सोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर काम करणार आहे. एवढेच नव्हे तर त्याच्या 1942 अ लव स्टोरी या हिट चित्रपटातील एक लडकी को देखा तो ऐसा लगा या गाण्याचे नाव चित्रपटाला देण्यात आले आहे. यात या गाण्याचे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून अनेकांनी त्याला पसंती दिली आहे. यासोबतच एक लडकी को देखा तो ऐसा लगामधील मुख्य कलाकार अनिल कपूर, जुही चावला, सोनम कपूर आणि राजकुमार राव यांचे पोस्टर रिलीज करण्यात आले. या चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनिल कपूर आणि जुही चावला यांचा रोमांस पाहाण्यास मिळू शकतो.