बुधवार, 29 नोव्हेंबर 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (14:56 IST)

Arjun Malaika Dance Video: मलायकाच्या ‘छैय्या छैय्या’गाण्यावर अर्जुन मलाईकाचा डान्स

फॅशन डिझाइनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहता हे 28 ऑगस्ट रोजी वैवाहिक बंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी त्यांनी एक छोटीशी पार्टी आपल्या मित्रांना दिली. या प्री वेडिंग पार्टीत अनेक सेलिब्रिटी आले होते. त्यात मलाईका आणि अर्जुन कपूर हे देखील उपस्थित होते. ते दोघे एकमेकांना डेट करत आहे. त्यांच्या लग्नाची वाट त्यांचे चाह्ते बघत आहे. ते दोघे बऱ्याचवेळा एकत्र दिसले आहे. या कुणाल आणि अर्पिताच्या प्री वेडिंग पार्टीमध्ये दोघांनी मलाईकाच्या छैय्या छैय्या गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर गाजला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. छैय्या छैय्या हे गाणं दिल से चित्रपटातील आहे. 1998 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यातील हे गाणं प्रचंड गाजलं होत. या आयटम सॉंग मुळे  मलाईका घराघरात पोहोचली.
या गाण्यावर अर्जुन आणि मलाईका ठेका धरताना दिसले. या पार्टीत वरुण धवन, शनाया कपूर, जान्हवी कपूर देखील उपस्थित होते. कुणाल रावल आणि अर्पिता हे 28 ऑगस्ट रोजी मुंबईच्या ताजमहाल पॅलेस मध्ये लग्न करणार आहे. लग्नापूर्वी त्यांनी प्री वेडिंग पार्टी ठेवली होती.