साउथ अभिनेता विजय सेतुपतीवर बंगळुरू विमानतळावर हल्ला
तमिळ अभिनेता विजय सेतुपती आणि त्याच्या अंगरक्षकावर बंगळुरू विमानतळावर हल्ला झाला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या धक्कादायक व्हिडीओमध्ये एक व्यक्ती विजयच्या टीममधील एका सदस्याकडे धाव घेत त्याच्यावर हल्ला करताना दिसत आहे. दरम्यान विजय ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना एका व्यक्तीकडून विजयलादेखील धक्काबुक्की करण्यात आली आहे.
विजय सेतुपती हा साउथमधील आघाडीचा अभिनेता आहे. लवकरच तो अनेक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मायकल, विक्रम, विदुथलाई अशा अनेक चित्रपटांमध्ये विजय मुख्य भूमिकेत दिसणार आहे.