बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जानेवारी 2020 (10:25 IST)

'भुज- द प्राइड ऑफ इंडिया' मध्ये शरद केळकर दिसणार

'तान्हाजी' चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यानंतर आता तो 'भुज- द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटामध्ये भूमिका साकारणार आहे. अभिनेता राणा दग्गुबातीच्या जागी शरद केळकरची वर्णी लागली आहे. राणा दग्गुबातीने त्याच्या तब्येतीमुळे चित्रपटातून माघार घेतली. त्यानंतर निर्मात्यांनी त्याच्या जागी शरदच्या नावाला पसंदी दिली आहे. 
 
भुज चित्रपटामध्ये शरदला पुन्हा अभिनेता अजय देवगनसोबत भूमिका साकरणार आहे. 'भुज हा चित्रपट ऍक्शनने परिपूर्ण असा चित्रपट आहे. अभिषेक दुधैया यांच्या खांद्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आहे. चित्रपटात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, परिणीति चोप्रा आणि एम्मी विर्क मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.