बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 23 डिसेंबर 2020 (14:57 IST)

'गंगूबाई काठियावाडी' वादात, गंगूबाईच्या कुटुंबाने संजय भन्साळी-आलियावर खटला भरला

संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट वादात पडला आहे. 
 
वास्तविक, गंगूबाईच्या कुटुंबीयांनी संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्याविरूद्ध बॉम्बे सिटी सिविल कोर्टात खटला दाखल केला आहे. या प्रकरणात गंगूबाईच्या कुटुंबीयांनी चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करीत आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन जैदी नावाच्या व्यक्तीने संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्याविरुद्ध 22 डिसेंबर रोजी खटला दाखल केला आहे. या सेलिब्रिटींना 7 जानेवारी 2021 पर्यंत उत्तर देण्यास मुदत देण्यात आली आहे.
 
हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसेन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर बनवला जात आहे. चित्रपटाचे शूटिंगही सतत सुरू आहे. दरम्यान, या नवीन वादामुळे निर्मात्यांना अडचणी येऊ शकतात.