मंगळवार, 1 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (11:21 IST)

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादा साहेब फाळके पुरस्कार देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून केली आहे. 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुनला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा 8 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित केला  जाणार आहे. मिथुन 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी नृत्याला नवी ओळख दिली.त्यांच्या नृत्यशैलीमुळे चित्रपट गाजायचे.
 
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून लिहिले आहे की, मिथुन चक्रवर्ती यांचा सिनेमॅटिक प्रवास पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना हा सन्मान देण्यात येत आहे. 
 
अभिनेता मिथुन केवळ अभिनयातच नाही तर ॲक्शन आणि डान्समध्येही निष्णात आहे. बंगाली, हिंदी, ओरिया, भोजपुरी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबी अशा विविध भाषांमध्ये त्यांनी अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. दो अंजाने हा त्याचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट होता. या चित्रपटात त्यांची खूप छोटी भूमिका होती.

यानंतर त्यांनी तेरे प्यार में, प्रेम विवाह, हम पांच, डिस्को डान्सर, हम से है जमाना, घर एक मंदिर, अग्निपथ, तितली, गोलमाल 3, खिलाडी 786 आणि द ताश्कंद फाइल्समध्ये काम केले आहे. त्यांनी मार्शल आर्ट्सचे तज्ञ प्रशिक्षण घेतले असून  ब्लॅक बेल्ट देखील मिळवले आहे.मिथुन चक्रवर्तीचे चाहते त्यांना हा पुरस्कार जाहीर केल्यावर खूप आनंदी आहे. 
Edited by - Priya Dixit