दीपिका रोज झोपण्यापूर्वी या हीरोच्या फोटोला करायची Kiss
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण लॉकडाउनमुळे आपल्या पती रणवीर सिंहसोबत सेल्फ क्वारंटाईन आहे. दीपिका या काळात आपल्या लहानपणीच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत आहे. दीपिकाने सांगितले की ती लहानपणी झोपण्यापूर्वी एका मोठ्या सेलिब्रिटीच्या फोटोला किस करत होती.
दीपिका पादुकोणने वोग मॅगझिन सोबत गप्पा मारत सांगितले की “मी आणि माझी बहीण अनीषा एक रूम शेअर करत होतो. आम्ही सोफ्यावर बसून तासोंतास खेळायचो. आमच्या खोलीच्या भीतींवर हॉलिवूड स्टार लियोनार्डो डीकैप्रियो यांचे अनेक पोस्टर्स होते, ज्यावर आम्ही झोपण्यापूर्वी किस करत होते आणि त्यांना गुड नाइट म्हणायचो.” दीपिकाने आपल्या बहिणीसह फोटो शेअर केला आहे. यात दोघी सोफ्यावर बसलेल्या दिसत आहे.
या पूर्वी दीपिकाने सोशल मीडियाद्वारे अनेक गोष्टी चाहत्यांपर्यंत पोहचवल्या आहेत.