गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

देवदत्त नागे सत्यमेव जयते मध्ये खलनायक साकारणार

जय मल्हार या मालिकेत खंडोबाची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका साकारत आहे. जॉन अब्राहमच्या आगामी ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात तो भूमिका साकारत असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये देवदत्तची झलकही पाहायला मिळते. हा सिनेमा 15 ऑगस्टरोजी प्रदर्शित होत आहे. 
 
या चित्रपटात मी खलनायकाची भूमिका साकारत आहे आणि जॉन एका महिलेला मला कानाखाली मारण्यास सांगत असतो असं दृश्य त्यात आहे. ती महिलासुद्धा माझ्या खंडोबाच्या भूमिकेनं इतकी प्रभावित झाली होती की मला मारण्यासच तयार होत नव्हती. अखेर मी तिला समजावून सांगितलं. तू कलाकार नाही तर मी साकारणाऱ्या भूमिकेचा विचार कर आणि अभिनय कर असा सल्ला मी तिला दिला. बराच वेळ तिला समजावून सांगितल्यानंतर तो सीन करण्यास ती तयार झाली,’ असं तो म्हणाला.