रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

जान्हवीला लागली चित्रपटांची लॉटरी

जान्हवी कपूरला करण जोहरने लॉन्च केल्यानंतर तिच्यासोबत आणखी 2 चित्रपट करणार असल्याची  माहिती समोर येत आहे. आता जान्हवी 'तख्त' तसेच आणखी एक चित्रपटात काम करतेय. जान्हवी आपला तिसरा चित्रपटही करणसोबत करणार आहे. तिने धर्मा प्रोडक्शन निर्मिती गुंजन सक्सेनाचा बायोपिक साइन केला आहे. या चित्रपटात जान्हवी भारतीय वायुदलाची पायलट गुंजन सक्सेनाचे पात्र साकारणार आहे. जान्हवी आता या चित्रपटासाठी मेहनत घेत असून ती गुंजनला दोन वेळा भेटली देखील आहे. चित्रपट सुरू करण्यापूर्वी गुंजनप्रमाणे चालणे व बोलणे शिकण्याची तिची इच्छा आहे.