Gadar 2 Online Leaked: सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाची एचडी प्रिंट लीक
Gadar 2 Online Leaked: गदर 2 रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट बंपर कमाई करेल अशी अपेक्षा आहे. हा चित्रपट जवळपास 40 कोटींची ओपनिंग घेणार असल्याचं बोललं जात आहे. या वीकेंडमध्येच हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करेल, असे बोलले जात आहे. हे सर्व नंतर होईल, त्याआधी 'गदर 2' ऑनलाइन लीक झाल्याची बातमी आहे.
बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या 'गदर 2' चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. 11 ऑगस्टला रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 'गदर 2'मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा तारा सिंह आणि सकीनाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
'गदर 2'चे शो अनेक थिएटरमध्ये हाऊसफुल्ल चालू आहेत. दरम्यान, अशी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे 'गदर 2'च्या निर्मात्यांना मोठा धक्का बसणार आहे. वास्तविक, 'गदर 2' ऑनलाइन लीक झाला आहे. हा चित्रपट एचडी प्रिंटसह लीक झाला आहे. अनेक लोक पायरसी वेबसाइटवरून 'गदर 2' डाउनलोड करत आहेत.
'गदर 2' लीक झाल्याचा थेट परिणाम त्याच्या कलेक्शनवर होणार आहे. मात्र, एखादा मोठा चित्रपट ऑनलाइन लीक होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी शाहरुख खानचा पठाणही ऑनलाइन लीक झाला होता.
'गदर 2' हा यावर्षी बॉक्स ऑफिसवर दुसरा सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Edited by - Priya Dixit