शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (10:24 IST)

मी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला आरोप

मी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त चर्चा होत असून त्यामुळे अनेकांची करिअर थांबली आहेत. आता बोल्ड अभिनेत्री मंदाना करीमीने 'क्या कूल हैं हम' सिनेमाच्या डायरेक्टरवर यौन शोषणाचा आरोप केला आहे. तिन म्हटलं की, 'या अनुभवामुळे मी माझं प्रोफेशन सोडण्यासाठी मजबूर झाले. ज्याच्यावर माझं खूप प्रेम होतं. मात्र मला सर्व सोडावे लागले. यौन शोषण म्हणजे मला स्पर्श करणं नाही. याचा अर्थ माझ्या जीवनाला नरक बनवणं आहे. मी खूप अडचणीत होते. मी याबद्दल कोणासोबतच बोलू शकत नाही असे ती नमूद करते. मंदानाने पुढे म्हटलं की, शोषण तेव्हापासून सुरु झालं जेव्हा तिने उमेशसोबत डेटवर जाण्यास नकार दिला. उमेशने गाण्यात माझे स्टेप्स बदलले आणि मला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. ण्यात इतर लोकांना देखील घेण्यात आल होते. सेटवर तो मला लवकर येण्यासाठी सांगायचा. तो मला असे कपडे घालायला सांगायचा जे माझ्यासाठी नव्हते. त्यामुळे मी फार अडचणीत आले त्यामुळे मी हे करिअर थांबवले होते.