शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (14:26 IST)

कार्तिक आर्यन गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला

‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर परदेशातूनही भाविक मुंबईमध्ये येत असतात. यावर्षी राज्य सरकारने सर्व करोना निर्बंध मागे घेतल्यामुळे राज्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. लालबाग नगरी गणरायाच्या आगमनाने सजली आहे. तसेच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता सेलिब्रिटी हजेरी लावतना दिसत आहेत.
अभिनेता कार्तिक आर्यन गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला आहे. याचदरम्यानचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. बी-टाऊनमधील इतरही सेलिब्रिटी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. कोव्हिड काळात मात्र यामध्ये खंड पडला होता. आता यावर्षी पुन्हा एकदा नवा जल्लोष आणि भाविक, सेलिब्रिटी दर्शनासाठी येत आहेत.