रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मे 2018 (08:42 IST)

‘भारत अने नेनू’ सर्वच विक्रम मोडीत काढणार

‘भारत अने नेनू’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.  हा चित्रपट जवळपास सर्वच विक्रम मोडीत काढणार असल्याचे दिसून येतचित्रपट प्रदर्शित होताच केवळ दोन दिवसांमध्ये त्याने १०० कोटींचा गल्ला जमवला. हा आकडा दिवसेंदिवस वाढत जाऊन आता तो २३० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची जादू आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील चालल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाने अमेरिकेमध्ये ३५ लाख डॉलर्सची कमाई केली आहे. हा चित्रपट आतापर्यंत ४५ देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटामध्ये राजकीय कथानकाला एक रंजक वळण देत कोरटला शिवा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली आहे.