गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (20:25 IST)

नवाजुद्दीनसोबत अथिया शेट्टी करणार 'मोतीचूर चकनाचूर'

आपल्या अभिनयातील वेगळेपणासाठी बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी ओळखला जातो. अनेकांची अशा या हरहुन्नरी अभिनेत्यासोबत काम  करण्याची इच्छा असतानाच ही संधी अभिनेत्री अथिया शेट्टीला मिळाली आहे. ती आगामी 'मोतीचूर चकनाचूर' चित्रपटात नवाजुद्दीनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 
 
या दोघांची जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र झळकताना दिसणार आहे. अथिया नवाजुद्दीनसोबत पहिल्यांदाच काम करण्याच्या अनुभवाबद्दल म्हणते, मी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नवाजुद्दीन यांच्या अभिनयातील बारकाव्यांचे निरीक्षण करत असते. मला अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात. यासोबतच नवाजुद्दीन सर एक उत्तम कलाकार असल्याचेही तिने म्हटले. 'मोतीचूर चकनाचूर' हा एक कॉमेडी चित्रपट असणार असून यात एक विचित्र वेडिंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अथिया आणि नवाजुद्दीनच्या जोडीला ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असणार आहेत.