रणबीरची यशराजच्या चित्रपटामध्ये पुन्हा एंट्री
रणबीर कपूर सध्या करण जौहरच्या चित्रपट ब्रह्मास्त्र व संजय दत्तच्या बायोपिक चित्रपटामध्ये बिझी आहे परंतू एका प्रदीर्घ काळानंतर रणबीरची पुन्हा एकदा यशराज फिल्म्समध्ये एंट्री होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
रणबीर कपूरने यशराजबरोबर आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दोन चित्रपटांमध्ये काम केले होते.
ते चित्रपट म्हणजे बचना ए हसीनों व रॉकेट सिंग परंतू त्यानंतर यशराज व रणबीर यांनी एकत्र येण्याचा योगायोग जुळून आला नाही परंतू आता या दोघांनी एकत्र येण्याची तयारी सुरु केली झाली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
आपले दोन्ही प्रोजेक्ट पूर्ण होताच रणबीर कपूर यशराजच्या एका नव्या चित्रपटामध्ये काम करणार आहे. हा एक रोमँटिक चित्रपट असेल. हा चित्रपट दिग्दर्शित करण्याची जबाबदारी पुनी मल्होत्राकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे.
पुनती सध्या धर्मा प्रोडक्शनचे चित्रपट बनवत आहेत. तो स्टुडंट ऑफ द इटर-2 चे दिग्दर्शन करणार आहे. सध्या यशराजकडून या वृत्ताला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही व याविषयी कोणती अधिकृत घोषणाही झालेली नाही.