गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रणवीरने थकवला ड्रायव्हरचा पगार

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या चित्रपटला सुरूवातीपासूनच अनेक अडचणींना सामना करावा लागला. पुन्हा एकदा या चित्रपटाच्या सेटवर नवा वाद पाहायला मिळाला.
 
स्पॉटबॉय या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अभिनेता रणवीर सिंगचा ड्रायव्हर आणि बॉडगार्ड यांच्या कडाक्याचं भांडर झालं असून त्यांच्या या भांडणामुळे चित्रीकरणसुद्धा थांबवण्यात आलं होतं. अत्यंत महत्त्वाच्या दृश्याचं फिल्मसिटीमध्ये चित्रीकरण सुरू असतानाच अचानक बाहेरून येणार्‍या हाणामारीच्या आवाजामुळे त्यात व्यत्यय येत होता. त्यावेळी चित्रपटाच्या क्रू मेंबर्सनीसुद्धा रणवीरच्या ड्रायव्हर आणि बॉडगार्डला शांत राहण्याची ताकीद दिली.
 
भन्साळी यांनाच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाहेर यावं लागलं. त्यांनी बाहेर येऊन पाहिलं तेव्हा रणवीरचा ड्रायव्हर सूरज पाल आणि बॉडीगार्ड विनायक यांच्यात झालेला वाद त्यांच्यासमोर आला. रणवीरच्या ड्रायव्हरला दोन महिन्यांचा पगार देण्यात आला नव्हता त्यामुळे त्याने मॅनेजरकडे थकलेल्या पगाराची मागणी केली पण मॅनेजरने त्यांचं म्हणणं ऐकून न घेता बॉडीगार्डला सांगून त्या ड्रायव्हरला बाजूला नेण्यास सांगितलं. बॉडीगार्डने त्यानंतर ड्रायव्हरला मारण्यास सुरूवात केली. त्यावेळी मॅनेजरने मध्ये पडत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. यानंतर रणवीरने ड्रायव्हरला कामावरून काढून टाकले.