शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (17:43 IST)

शाहिद कपूरला 'विवाह'च्या वेळी पगडी घालायची नव्हती

shahid kapoor
2006 साली प्रदर्शित झालेला शाहिद कपूर आणि अमृता राव यांचा 'विवाह' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या कथेपासून ते प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खूप आवडले. या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते.
 
आता 'विवाह' रिलीज होऊन 16 वर्षांनंतर सूरज बडजात्याने चित्रपटाबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, शाहिद कपूरने चित्रपटातील लग्नाच्या दृश्यात पगडी घालण्यावर आक्षेप घेतला होता. यामुळे तो खूप नाराजही होता.
 
सूरज बडजात्याने असेही सांगितले की, शाहिद कपूरने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेकवेळा वेशभूषेवर आक्षेप घेतला होता. तो शाहीदला अरेंज्ड मॅरेजबद्दल काहीच माहिती नसल्याबद्दल चिडवत असे. शूटिंगदरम्यान शाहिदला अमृताला भेटायला जावं लागलं तेव्हाही शाहिदने आपल्या मनमानीनुसार कोट आणि जीन्स घातली होती.

सूरज बडजात्या म्हणाले, 'विवाह'च्या शूटिंगदरम्यान लग्नाचा सीन शूट होत असताना शाहिदला डोक्यावर पगडी बांधावी लागली. हे सांगितल्यावर तो खूप अस्वस्थ झाला. या निर्णयावर कलाकार खूश नव्हते.
 
'विवाह' चित्रपटात शाहिद आणि अमृता यांच्याशिवाय आलोक नाथ, अनुपम खेर, समीर सोनी आणि सीमा बिस्वास महत्त्वाच्या भूमिकेत होते. या फॅमिली ड्रामा चित्रपटातील गाणीही सुपरहिट झाली होती.
Edited by : Smita Joshi