शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

हे सर्व दिग्गज बॉलीवूडचे स्टार आहेत गंभीर आजाराने त्रस्त

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना पोटाच्या तक्रारीमुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डायवर्टिकुला नामक आजार आहे. तनुजा यांच्यासारखेच बरेच दिग्गज कलाकार आहेत जे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. मात्र त्यांच्या सारखे दिग्गज देखील मोठ्या आजारांनी त्रस्त आहेत.
 
अमिताभ बच्चन गेल्या ३७ वर्षांपासून लीवरच्या आजाराने ग्रस्त आहेत. ३७ वर्षांपूर्वी ते कुली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीररित्या जखमी झाले होते. त्यावेळी या अपघातात त्यांच्या लीवरला इजा झाली होती.  
 
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती आता ठीक आहे. पण, ते बऱ्याच कालावधीपासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्याशिवाय त्यांच्या फुफ्फुसातदेखील इन्फेक्शन होते.
 
अभिनेते धर्मेंद्र १५ वर्षांपर्यंत डिप्रेशनमध्ये होते. याच दरम्यान त्यांना दारूचे व्यसन जडले होते. 
 
मिथुन चक्रवर्ती यांना क्रॉनिक बॅक पेनचा त्रास आहे. मागील वर्षी ही समस्या वाढल्यामुळे त्यांना अमेरिकेत उपचारासाठी नेण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली.
 
ऋषी कपूर बऱ्याच कालावधीपासून कर्करोगावर उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की ऋषी कपूर यांची कर्करोगापासून मुक्त झाले आहेत. मात्र त्यांचे बोन मैरो ट्रान्सप्लांट करायचे बाकी आहे. त्यांना कोणत्या प्रकारचा कर्करोग आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.