सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (11:04 IST)

'रामायण' मध्ये सुमंत ची भूमिका साकारणारे चंद्रशेखर वैद्य यांचे निधन, भारत छोडो आंदोलनात सामील होते

रामानंद सागर यांच्या 'रामायण' मुळे कित्येक कलाकारांना ओळख मिळाली आहे. या मालिकेत काम केलेल्या बर्‍याच कलाकारांना त्यांच्या वास्तविक नावाऐवजी त्या पात्राच्या नावाने ओळखले जाते. त्याचवेळी रामायणातील महाराज दशरथ यांचे महामंत्री आर्य सुमंतची भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे निधन झाले आहे.
 
चंद्रशेखर वैद्य 98 वर्षांचे होते आणि वया संबंधित समस्यांमुळे त्यांचे निधन झाले. चंद्रशेखर यांचा मुलगा अशोक चंद्रशेखर यांनी वडिलांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. चंद्रशेखर वैद्य यांचा जन्म 1923 मध्ये हैदराबाद येथे झाला होता. एक काळ असा आला की चंद्रशेखर पहारेकरी म्हणूनही काम करत असे. 1942 साली ते भारत छोडो चळवळीचा एक भाग होते. घरी परतल्यानंतर चंद्रशेखर वैद्य यांनी राम गोपाल मिल्समध्ये काम केले.
 
मित्रांच्या सांगण्यावरून चंद्रशेखर मुंबईत चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्यासाठी आले. त्यांनी 50 ते 90 च्या दशकात गेट वे ऑफ इंडिया, बरसात की रात, कटी पतंग, द बर्निंग ट्रेन, नमक हलाल, डिस्को डान्सर, शराबी, त्रिदेव या चित्रपटांमध्ये काम केले.
 
चंद्रशेखर वैद्य रामायण मालिकेतील सर्वात व्यस्कर अभिनेते होते. त्यावेळी ते 65 वर्षांचे होते. चंद्रशेखर वैद्य आणि रामानंद सागर हे दोघेही चांगले मित्र होते. त्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी आर्य सुमंतची व्यक्तिरेखा साकारली.