बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 6 मे 2020 (12:20 IST)

पाणीपुरी कशी खायची? विकी कौशल देतोय धडे

लॉकडाउनमुळे सर्वच बॉलिवूड सेलिब्रिटी सध्या घरी आहेत. मात्र, सोशल मीडियाद्वारे ते चाहत्यांच्या कायम संपर्कात आहेत. अभिनेता विकी कौशल याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो चाहत्यांना पाणीपुरी कशी खायची, याचे धडे देताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विकी कौशल पाणीपुरी खाताना दिसत आहे. पण यासोबतच त्याने मुंबईमध्ये पाणीपुरी कशी खाल्ली जाते याचे प्रात्यक्षिक सुद्धा दिले आहे.

विकीचा हा व्हिडिओ आताचा नाही तर जुना आहे. मात्र, सध्या लॉकडाउनमध्ये हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत पाणीपुरीचे चाहते आपल्याला पाहायला मिळतात. लॉकडाउनमुळे हा आवडीचा पदार्थ अनेकांना बाहेर खायला मिळत नाहीये. काहीजण घरीच पाणीपुरी बनवून त्याचा आस्वाद घेत आहेत. सेलिब्रिटींनीही पाणीपुरी खातानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.