बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 31 डिसेंबर 2018 (10:55 IST)

दिपीका कक्कर बिगबॉस १२ ची विजेता

दिपीका कक्कर बिगबॉस १२ ची विजेता बनली आहे.बिगबॉस जिंकून ती ५० लाखाची विजेती ठरली फायनल राउंडला तिघांनाएक टास्क दिला या मध्ये जो पहिल्यांदा अलार्म वाजवेल त्याला मोठी रक्कम असलेली बॅग मधील २० लाख रुपयांची रक्कम मिळेल दीपक ठाकूरने अलार्म वाजवून दीपक ठाकूर  बॅग घेऊन बाहेर पडला बहिणीच्या लग्नासाठी त्यानी हा निर्णय घेतला असे त्यानी सलमान खान यांना सांगितले. शेवटी श्रीशांत आणि दीपिका बिगबॉस च्या च्या घरात राहिले.बिगबॉस च्या घराची लाईट बंद करून हे दोघे बाहेर पडले आणि सलमान खान ने या दोघांमध्ये दिपीका कक्कर ला बिगबॉस १२ ची विजेती घोषित केले. या वेळी बिगबॉस १२ मधील सर्व सदस्य उपस्थित होते. बिग बॉसच्या घरातील सदस्य, त्यांचा स्वभाव आणि विविध परिस्थितींशी सामना करण्याची त्यांची ताकद यावरून प्रेक्षकांनी बिग बॉस-१२ च्या विजेतीची निवड केली आहे. 'बिग ब्रदर' या रियालिटी शोवर आधारित 'बिग बॉस' या रियालिटी शोच्या विजेत्यांना ट्रॉफी आणि ५० लाख रुपये देण्यात येते.