शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (21:21 IST)

दंत शल्य चिकित्सकसाठी (BDS) अखेरच्या राउंडची प्रवेश प्रक्रिया सुरु

नाशिक – वैद्यकीय शिक्षण घेऊन यशस्वी डॉक्टर व्हावे असे युवक-युवतींचे स्वप्न असते. त्या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. सध्याच्या काळात मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना विशेष प्रयत्न करावे लागतात. एमबीबीएस, बीएमएमएस आणि बीएचएमएस या शाखांसोबत बीडीएस (BDS) अर्थातच दंत शल्य चिकित्सक या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
संवेदनशील आणि वेदनादायक समजल्या जाणाऱ्या दंतउपचारांबाबत शिक्षण घेण्यासाठी आता विद्यार्थ्यांची पावले या क्षेत्राकडे वळू लागली आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी NEET परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी महाराष्ट्रातील होते. राज्यातून एकूण 2 लाख 44 हजार 903 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 13 हजार 812 विद्यार्थ्यांनी नीट (NEET) परीक्षेत यश मिळवले. संस्थास्तरावर प्रवेश घेण्यासाठी स्टेट सीईटी मार्फत पात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत समाविष्ट करण्यात आलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असतील.
 
पात्र विद्यार्थ्यांनी समक्ष अर्ज करावयाचा कालावधी
प्रक्रिया…..दिनांक व वेळ….
महाविद्यालयात अर्ज करण्याचा कालावधी ……१९/१२/२०२२ व २०/१२/२०२२ : सायंकाळी ५ वाजेपर्यंत
महाविद्यालयाकडे आलेले अर्ज, गुणवत्ता यादी, निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करणे….२०/१२/२०२२ : सायंकाळी ६ वाजेपर्यंत
प्रथम निवड यादीतील विद्यार्थ्यांसाठी रुजू होण्यासाठीचा कालावधी….२१/१२/२०२२ : दुपारी ३ वाजता
प्रथम निवड यादीतील रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करणे….२१/१२/२०२२ : ३.३० वाजेपर्यंत
रिक्त राहिलेल्या जागांच्या प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रुजू होण्याचा कालावधी….२१/१२/२०२२ : ५.३० वाजेपर्यंत
अंतिम प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी……२१/१२/२०२२ : सायंकाळी ६ वाजता
 
या आहेत भविष्यातील संधी
· दंत संशोधन वैज्ञानिक
· दंतचिकित्सक (डेंटिस्ट)
· व्याख्याता
· डेंटल सर्जन
· ओरल सर्जरी
· फार्मा कोव्हिजीलन्स (Pharmacovigilance)
 
बीडीएसनंतर पुढे काय?
· दंतचिकित्सकाचा सराव
· खासगी व सरकारी दवाखान्यात डेंटिस्ट म्हणून संधी
· स्वतःचे क्लिनिक उभारून रुग्णसेवा
· व्याख्याता म्हणून संधी
· फार्मा कंपनीमध्ये संधी
· एमडीएस MDS (Master Of Dental Surgery)
· एमपीएच MPH (Master Of Public Health)
· एमबीए MBA (Healthcare and Hospitality Management)
· एमएचए (Master in Health Administration)

Edited by : Ratnadeep Ranshoor